लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोषित आणि पीडित बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. या मूलमंत्रामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजबांधवांमध्ये जागृतीच्या सूर्याची किरणे पडली. त्यांना होणाºया अन्यायाची जाणीव झाली. परिणामी आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. शिक्षणामुळे जगण्याची दृष्टी आली. समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची उर्मी मिळाली. मात्र, महामानवाचा संघटित व्हा हा मूलमंत्र अंगी बाळगला नाही. शिक्षणात प्रगती केली, संघर्षही केला. परंतु, संघटित नसल्यामुळे शिक्षणात प्रगती करूनही त्याला अर्थ उरला नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाने संघटित होण्याची आज खरी गरज आहे, असा धम्म संदेश भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये जीवन जगण्याचे सामर्थ्य आहे. आपले जीवन सुखकर घडवायचे असेल तर त्यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.भदंत ससाई यांना शुभेच्छाडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध संघटनांच्यावतीने रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इंदोरा मोठा बुद्ध विहार येथील त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आशीर्वाद घेतले.
बाबासाहेबांचा मूलमंत्र अंगी बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:26 AM
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शोषित आणि पीडित बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला.
ठळक मुद्देधम्मसंदेश : भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई