लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे होत नाही तोच रुग्णांना ‘बेड रोल’ देणे बंद झाले. योजना बंद करण्याचे नेमके कारण, मात्र कुणाचकडे नाही.नागपूर, विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड व आंध्रप्रदेश आदी राज्यातूनही हजारो गरीब महिला रुग्ण तपासणी व प्रसूतीसाठी डागा रुग्णालयात येतात. दिवसभरात ३५ ते ४० महिलांची प्रसूती होते. या रुग्णालयात वर्षाला १२ हजारांवर प्रसूती होतात. राज्यात सर्वाधिक बाळंतपण केलेल्या या रुग्णालयाला पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. रेल्वे प्रवाशांना दिले जाणारे चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल म्हणजेच ‘बेड रोल’च्या धर्तीवर डागा रुग्णालयात ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयाची प्रगती पाहता राज्यात प्रायोगिक स्तरावर या रुग्णालयात ही अभिनव योजना हाती घेण्यात आली. रुग्णांना होणारा जंतुसंसर्ग कमी करण्याचा, मातेच्या आरोग्याची निगा राखण्याचा आणि स्वच्छतेचे महत्त्व त्यांना माहिती व्हावे, हा या मागील उद्देश होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते वॉर्ड क्र. ६ मधील एका महिला रुग्णाला ‘बेड रोल’चे पॅकेट देऊन उद्घाटन झाले. त्यावेळी आर.एस. फारूखी वैद्यकीय अधीक्षक होते. ते असेपर्यंत त्यांनी ही योजना योग्यरीत्या सांभाळली. परंतु त्यांची बदली होताच योजनेला घरघर लागली.सूत्रानुसार, गेल्या वर्षापासून रुग्णाला बेड रोल देणे बंद झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या, यावर होणारा खर्च, दिलेले साहित्य परत मिळत नसल्याच्या तक्रारी, असे अनेक कारण असल्याचे सांगण्यात येते. ‘बेड रोल’ बंद झाले असलेतरी रुग्णांच्या खाटेवर हे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते, असे एका महिला अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या सुटीवर असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
डागा रुग्णालयातील रुग्णांना ‘बेड रोल’बंद :तीन वर्षातच गुंडाळली योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:20 PM
गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे होत नाही तोच रुग्णांना ‘बेड रोल’ देणे बंद झाले. योजना बंद करण्याचे नेमके कारण, मात्र कुणाचकडे नाही.
ठळक मुद्देआरोग्य मंत्र्यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन