शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वर्षभरात सात पटीने वाढले बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:08 AM

मनपा प्रशासनाचा दावा : पहिल्या लाटेच्यावेळी ९८९ तर आता ७७४५ बेड उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या ...

मनपा प्रशासनाचा दावा : पहिल्या लाटेच्यावेळी ९८९ तर आता ७७४५ बेड उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात परिस्थिती गंभीर होती. रूग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत होती. पहिली लाट ओसरल्यानंतर महापालिका प्रशासनाने दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रूग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. उशिरा का होईना यातून धडा घेत व कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासन आरोग्य यंत्रणा बळकट करण्याच्या कामात लागले. १ एप्रिल २०२० रोजी नागपुरात ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर असलेल्या एकूण बेडची संख्या ९८९ होती. आता शहरात शासकीय, खाजगी आणि मनपा रुग्णालयांमध्ये ७७४५ बेड उपलब्ध आहेत.

१ एप्रिल २०२० रोजी ८०५ ऑक्सिजन बेड होते. १८४ आयसीयू तर ८७ व्हेंटिलेटर असलेले बेड होते. आता शासकीय, मनपा आणि खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ४८६५ ऑक्सिजन, २२७४ आयसीयू तर ५८१ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी सप्टेंबर २०२० पासून बेडची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांचा खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यात मोठा वाटा आहे. त्यांना या कार्यात पदाधिकाऱ्यांचीही साथ मिळाली.

पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये तर दुसऱ्या लाटेत एप्रिल २०२१ मध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. १ एप्रिल २०२० रोजी सर्व प्रकारचे बेड ९८९ होते. १ ऑगस्ट २०२० रोजी ही संख्या १५१४ तर ३० सप्टेंबर २०२० रोजी ३४५४ करण्यात आली. तर ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९९३ करण्यात आली. ३१ जानेवारीला ३९१० तर २८ फेब्रुवारीला कोरोना रुग्णांसाठी नागपूर शहरात ३९१३ बेड उपलब्ध होते.

दरम्यान मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात शिरकाव केला. आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण वाढला. रूग्णांना बेड मिळत नव्हते. प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले. शासकीय, खाजगी आणि मनपा रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांच्या उपचारासाठी ३१ मार्चला ४६८२ बेड,तर १३ मे रोजी ७७४५ बेड उपलब्ध करण्यात आले.

...

धोका अजूनही कायम

मनपा प्रशासनाने काही रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यावरही भर दिला. नियोजनामुळे आता दुसऱ्या लाटेत मे महिन्याच्या उत्तरार्धात रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आणि मृत्यूसंख्येचा दरही घटला. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यास प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

....

तारीख बेडची संख्या ऑक्सिजन बेड आयसीयू व्हेंटिलेटर

१ एप्रिल २० ९८९ ८०५ १८४ ८७

१ ऑगस्ट २० १५१४ ११४४ ३१६ २३६

३० सप्टेंबर २० ३४५४ २९६१ ८९५ ३३५

३१ डिसेंबर २० ३९९३ २६७३ १२०८ ३४९

३१ जाने.२१ ३९१० २६०५ ११९१ ४२९

२८ फेब्रुवारी २१ ३९१३ २६०५ ११९४ ४२९

३१ मार्च २१ ४६८२ ३१२४ १३३० ४२९

१२ एप्रिल २१ ५५५३ ३७०५ १६५७ ४९०

१८ एप्रिल २१ ६३८७ ४२०५ १९१३ ५१८

२४ एप्रिल २१ ७१४४ ४६५३ २१३३ ५४२

२७ एप्रिल२१ ७३२७ ४६८६ २१७१ ५५५

१ मे २१ ७६३२ ४८०६ २२४३ ५७३

एकूण ७७४५ ४८६५ २२७४ ५८१