लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयाचा समावेश असणार आहे. २३ सप्टेंबरला या योजनेचे लोकार्पण झाले असलेतरी अद्यापही या शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर ‘आयुष्यमान भारत’चे फलक लागले नाहीत.आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे लोकार्पण रविवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला वर्षातून एकदा पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. कोणत्याही आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ३०१ लाभार्थी कुटुंबाचा समावेश आहे. याच कुटुंबातील पाच व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) , सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालयात सुरू झाली आहे. परंतु अद्यापही एकाही रुग्णाला याचा लाभ मिळालेला नाही.शहरात १ लाख ७६ हजार कुटुंब लाभार्थीया योजनेत महानगरपालिकेच्या १३५ वॉर्डातील १ लाख ७६ हजार १०३ कुटुंब तर ११ नगरपालिकांमधील १९३ गावांमध्ये २४ हजार २९५ कुटुंब असे एकूण ३२८ वॉर्डातील २ लाख ३९८ पात्र कुटुंबीयांचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत अंतर्गत १८९१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात १ लाख ७६ हजार ९०३ पात्र कुटुंब आहेत.
आयुष्यमान भारताची सुरुवात शासकीय रुग्णालयांमधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 8:27 PM
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात्र कुटुंबीयाचा समावेश असणार आहे. २३ सप्टेंबरला या योजनेचे लोकार्पण झाले असलेतरी अद्यापही या शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर ‘आयुष्यमान भारत’चे फलक लागले नाहीत.
ठळक मुद्देलोकार्पणानंतरही केंद्रावर फलक नाही : मेयो, मेडिकल, सुपर व डागा रुग्णालयांचा समावेश