लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. रामनगरस्थित श्री शक्तीपीठ येथे सुरू झालेला हा वर्ग १८ जूनपर्यंत चालणार आहे.समाजातील वातावरण गढूळ होत असून याला स्वच्छ करण्यासाठी सेविकांनी प्रशिक्षित होऊन सज्ज होणे गरजेचे आहे. १९३८ सालापासून समितीमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्याची पद्धत सुरु झाली असून गेली ८० वर्षे हे वर्ग निरंतर होतं आहेत,असेही अन्नदानम् यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असतो. कितीही प्रलोभन समोर आले तरीही मी माझी मातृभूमी सोडून कधीच जाणार नाही, असा निश्चय केला असल्याचे मत धनश्री लेकुरवाळेने व्यक्त केले. यावेळी वर्गाधिकारी अंबिका नागभूषण यादेखील उपस्थित होत्या. या प्रशिक्षण वर्गाला देशभरातील २० प्रांतांमधून ६० सेविका आल्या आहेत.
राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:40 AM
राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय वर्ष (प्रवीण) प्रशिक्षण वर्गाला शनिवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले तर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे अध्यक्षस्थानी होत्या. रामनगरस्थित श्री शक्तीपीठ येथे सुरू झालेला हा वर्ग १८ जूनपर्यंत चालणार आहे.
ठळक मुद्दे अखिल भारतीय कार्यवाहिका सीता अन्नदानम् यांच्या हस्ते उद्घाटनदेशभरातील २० प्रांतांमधून ६० सेविका आल्या