लाेकमत न्यूज नेटवर्क
बेलाेना : श्रीदत्तजयंतीनिमित्त बेलाेना (ता. नरखेड) येथे दरवर्षी श्री बजरंगबलीची तीन दिवसीय रथयात्रा आयाेजित केली जाते. काेराेना संक्रमणामुळे यावर्षी या रथयात्रेला जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही, अशी माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांनी दिली. त्यामुळे यावर्षी रथयात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी बेलाेना येथील राममंदिरात नुकतीच सभा पार पडली. त्यात उपविभागीय पाेलीस अधिकारी नागेश जाधव यांनी ठाणेदार जयसिंग मिरासे, उपनिरीक्षक बी. देशमुख, ग्रामपंचायत पदाधिकारी, मंदिर विश्वस्त, आयाेजक व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आल्याने या रथयात्रेला परवानगी नाकारण्यात आल्याचेही नागेश जाधव यांनी स्पष्ट केले. ही रथयात्रा यावर्षी २९ ते ३१ डिसेंबर या काळात हाेणार हाेती.
...
गावात प्रवेशबंदी
ग्रामपंचायत प्रशासन व रथयात्रा समितीने गावात दवंडी देऊन तसेच ठिकठिकाणी पत्रके लावून ही रथयात्रा रद्द झाल्याची माहिती नागरिकांना द्यायला सुरुवात केली आहे. गावात बाहेरगावाहून कुणाच्याही घरी पाहुणे येणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयाेजकांनी केले आहे. २९ ते ३१ डिसेंबर या काळात बाहेरगावातील व्यक्तींना बेलाेना येथे प्रवेशबंदी करण्यात येणार असल्याचे पाेलीस प्रशासनाने स्पष्ट केले. मंदिरातील पूजा व आरती फक्त पाच व्यक्तींच्या उपस्थितीत केली जाणार असून, भाविकांनी दुरून दर्शन घ्यावे तसेच मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पाेलीस प्रशासनाने केले आहे.