शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

लाभार्थीच नाकारताहेत ‘जन आरोग्य’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:59 AM

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेचा खर्च बसत नसल्याने रुग्ण अडचणीत मार्ग काढण्याचा उमटला सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मंजूर निधी कमी पडल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून वरचे पैसे मागण्यावर आक्षेप घेतल्याने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेविना एका युवकाचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना पुन्हा एका रुग्णाला या समस्येला तोंड द्यावे लागले. अखेर रुग्णाचा नातेवाईकांनी या योजनेलाच नाकारले. पैसा गोळा करून शस्त्रक्रिया केली. यामुळे योजनेचा पॅकेजमधील निधीपेक्षा उपचारात जास्त खर्च येणाऱ्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी योजनेनेच पुढाकार घ्यावा, असा सूर उमटू लागला आहे.‘क्रॉनिक अ‍ॅरोटिक डिसेक्शन’चा रुग्ण असलेला अंकेश लिमजे (२२) हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असल्याने त्याला उपचारासाठी दीड लाखाचा निधी मंजूर झाला होता. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागात त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. परंतु शस्त्रक्रियाचा खर्चच २ लाख २५ हजारावर जाणार होता. जास्तीचा ७५ हजार रुपयांच्या खर्चाची जबाबदारी रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ तयार केला. परंतु हॉस्पिटलच्या जनआरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी यावर आक्षेप घेतला.रुग्णांकडून शस्त्रक्रियेला लागणारे वरचे पैसे घेता येणार नाही, असे रुग्णालयाला सांगितले. यामुळे विभागाने शस्त्रक्रिया थांबवली. रुग्णाची प्रकृती पाहता यावर मार्ग काढण्याची सूचनाही केली. शस्त्रक्रियेचा खर्च हा दीड लाखांपेक्षा जास्त येत असल्याने व रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसेही घेता येत नसल्याने काय करावे, हा प्रश्न होता. शस्त्रक्रिया दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. अखेर ११ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रियेविनाच अंकेशचा मृत्यू झाला. असेच एक प्रकरण गेल्या आठवड्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल समोर आले.एक ३५ वर्षीय युवक हा जनआरोग्य योजनेचा लाभार्थी असल्याने दीड लाख रुपये मंजूर झाले. परंतु शस्त्रक्रियेसाठी आणखी ३० ते ५० हजाराची गरज होती. वरचे पैसे घेता येत नसल्याची रुग्णालय प्रशासनाने अडचणही सांगितली. रुग्णाची प्रकृती पाहता नातेवाईकांनी योजनेलाच नाकारून पैसे गोळा करून दिले. यामुळे बुधवारी त्या रुग्णावर शस्त्रक्रियाही झाली.योजनेचा उद्देशालाच हरताळदारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील रुग्णांवर मोफात उपचार व्हावे म्हणून महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेत हृदय शस्त्रक्रियेसाठी जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचे पॅकेज आहे. परंतु हृदयाचा काही रुग्णांना ‘टिश्यू व्हॉल्व’ सोबत इतरही आवश्यक साहित्यांची गरज असते. हा खर्च पॅकेजच्या बाहेर जातो. लाभार्थी रुग्णांकडून वरचे पैसे घेता येत नसल्याने विशेषत: शासकीय रुग्णालय अडचणीत येते. यामुळे रुग्णच ही योजना नाकारून पदरमोड करून पैसा उभा करीत आहे. परिणामी, या योजनेचा मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.योजनेच्या अधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढायला हवामहात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभार्थी असतानाही अनेकवेळा काही रुग्णांचा शस्त्रक्रियेचा खर्च हा पॅकेजच्या बाहेर जातो. या रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचीही गरज असते. अशावेळी योजनेतील वरिष्ठ अधिकाºयांची समिती असल्यास व त्यांना पॅकेजच्यावर लागणाºया पैशांना मंजुरी देण्याचे अधिकार दिल्यास या योजनेचा खरा फायदा रुग्णांना होऊ शकेल.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Healthआरोग्य