लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा (कोविड-१९) संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावी कार्य करीत आहे. याच दरम्यान शहरातील कन्सल्टंट इन्टरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट यांनी कठीण ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘सेफ्टी बॉक्स’ तयार केला आहे. यामुळे बाधित रुग्णांकडून इतरांना होणारा संक्रमणाचा धोका कमी करता येऊ शकतो, असा दावा डॉ. अरबट यांनी केला आहे.‘ब्रॉन्कोस्कोपी सेफ्टी बॉक्स’ तयार करणारे डॉ. अरबट म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या शिंकेमुळे किंवा खोकल्यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण होतो. हा धोका कमी करण्यासाठी ‘सेफ्टी बॉक्स’मध्ये दोन ‘ऑपरेटर अपरेचर’ लावण्यात आले आहे. याला प्लास्टिक शीट व्हॉल्वने कव्हर केले आहे. याला उघडता आणि बंद करता येते. यात एक अतिरिक्त ‘अपरेचर’ (छिद्र) सुद्धा आहे, ज्याला निगेटिव्ह सक्शन कॅनलशी जोडले आहे. यामुळे ‘कोव्हीड-१९’ रुग्णाची श्वसन प्रक्रिया थांबली तरीही ते काम करीत असते. एकूणच हे उपकरण फारच लाभदायक आहे.डॉ. अरबट म्हणाले, श्वसनाच्या आजाराच्या रुग्णावर अशा ‘प्रोटोटाईप मॉडेल’चा उपयोग पूर्वीपासूनच होत आला आहे. याचे चांगले परिणामही दिसून येतात. युरोपियन देशातील ‘इटेलियन सोसायटी ऑफ हॉस्पिटल पल्मोनोलॉजी’मध्ये या सिक्युरिटी बॉक्सचे प्रात्याक्षिकही दाखविले जाईल. या उपकरणामुळे ‘क्रॉस इन्फेक्शन’ धोका कमी होईल.
कोरोना उपचारात 'ब्रॉन्कोस्कोपी सेफ्टी बॉक्स'लाभदायक : समीर अरबट यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:38 AM
कोरोना विषाणूचा (कोविड-१९) संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावी कार्य करीत आहे. याच दरम्यान शहरातील कन्सल्टंट इन्टरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट यांनी कठीण ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘सेफ्टी बॉक्स’ तयार केला आहे.
ठळक मुद्देबाधित रुग्णाकडून संक्रमणाचा धोका होतो कमी