मंगेश व्यवहारेनागपूर : सातवा वेतन आयोग फरकाचा चवथा हप्ता जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणेबाबत वित्त विभागांकडून २४ मे २०२३ रोजी जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे पहिला , दुसरा , तिसरा हप्ता मिळालेला आहे. परंतु राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत शासन निर्णय निर्गमित होवूनही निधी अभावी दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामुळे चौथा हप्ता प्रदान करणेबाबतच्या शासन निर्णयाचा काय फायदा? असा सवाल शिक्षक, शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.
राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ दुसरा, तिसरा व चौथा हप्ता अदा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी यांचेकडून करण्यात आली आहे.