सराफा बंदमुळे फटका : वधूपक्षाची होत आहे अडचण, दागिने बनवायचे कुठे?रिता हाडके नागपूरगेल्या एक महिन्यांपासून सराफा बाजार बंद असल्यामुळे लग्नसराईच्या काळात वधू व वर पक्षांची चांगलीच अडचण झाली आहे. अनेक कुटुंबांमध्ये वाग्दत्त वधूला ‘आर्टिफिशिअल ज्वेलरी’ वापरण्यास सांगण्यात येत आहे तर वरालादेखील सोन्याऐवजी दुसरी ‘ज्वेलरी’ वापरण्यासाठी समजावण्यात येत आहे.अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी संप पुकारला असून दुकानांना कुलूप लागलेले आहे. एरवी नेहमीच गजबजलेल्या सराफा ओळीमध्ये शांतता आहे. लग्नप्रसंगी लोक आपली सून किंवा जावयाला सोन्याचांदीचे दागिने देतात. परंतु या संपामुळे नाईलाजाने मंगळसूत्रापासून नथ, अंगठी, चेन, कर्णफुले इत्यादींसाठी ‘आर्टिफिशिअल ज्वेलरी’ वापरावी लागत आहे. कसेबसे सूनेला समजावलेत्रिमूर्ती नगर येथील रहिवासी सोमनाथ (नाव बदललेले) यांनी सांगितले की त्यांच्या मुलाचे लग्न एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आहे. मार्चमध्ये लग्न ठरल्यानंतर सुनेसाठी सोन्याचे दागिने घेण्यासाठी सातत्याने सराफा ओळीच्या चकरा मारत आहेत. परंतु सोनेचांदीची दुकाने सुरू नसल्याने केवळ पायपीट होत आहे. अखेर सुनेला कसेबसे समजावून ‘आर्टिफिशिअल’ दागिने विकत घेतले आहेत. तसे पाहिले तर हे सुनेला देणे आम्हालाच चुकीचे वाटत आहे. परंतु आमचादेखील नाईलाज आहे, असे ते म्हणाले.
बेन्टेक्स दागिन्यांवर शुभमंगल!
By admin | Published: April 01, 2016 3:09 AM