नगरसेवकांची चिंता वाढली : मनपाचा अर्थसंकल्प जून महिन्यात?नागपूर : महापालिकेच्या पहिल्याच सभेत विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच परिवहन समितीच्या सभापतींची घोषणा अपेक्षित होती. मात्र भाजपातील अंतर्गत वादामुळे सभापतींची नियुक्ती रखडली आहे. अद्याप परिवहन समिती गठित न झाल्याने महापालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला ब्रेक लागला आहे. पुढील सभागृहात परिवहन समितीची निवड न झाल्यास अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.महापालिका कायद्यानुसार स्थायी समितीप्रमाणे परिवहन समितीलाही स्वतंत्र आर्थिक अधिकार आहेत. परंतु परिवहन सभापतींची निवड न झाल्याने समितीचा अर्थसंकल्प रखडला आहे. नियमानुसार परिवहन समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात समावेश केला जातो. त्यानुसार स्थायी समितीला अ, ब आणि क तीन विभागात अर्थसंकल्प सादर करावा लागतो. अ विभागात महापालिके चा ताळेबंद, ब विभागात घनकचरा व्यवस्थापन तर क विभागात परिवहन समितीच्या ताळेबंदाचा समावेश राहणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार स्थायी समितीने प्रस्तावित अर्थसंकल्प तयार केला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारीही केली होती. परंतु परिवहन समितीचा अर्थसंकल्प सादर न झाल्याने, स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करता आलेला नाही. परिवहन समितीचा अर्थसंकल्पाला बे्रकमे महिन्यात परिवहन समितीची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर समिती आपला अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर क रेल. त्यानंतर स्थायी समिती विशेष सभा आयोजित करून अर्थसंकल्प सादर करणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती विचारात घेता स्थायी समितीचा अर्थसंकल्प जून महिन्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे. परिवहन समितीचा अडसर असल्याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले, असे काहीही नाही. आमचा स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार आहे. तो लवकरच सादर केला जाईल. (प्रतिनिधी)मे महिन्यात परिवहन समितीची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर समिती आपला अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर क रेल. त्यानंतर स्थायी समिती विशेष सभा आयोजित करून अर्थसंकल्प सादर करणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती विचारात घेता स्थायी समितीचा अर्थसंकल्प जून महिन्यात सादर केला जाण्याची शक्यता आहे. परिवहन समितीचा अडसर असल्याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले, असे काहीही नाही. आमचा स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार आहे. तो लवकरच सादर केला जाईल. (प्रतिनिधी)आधी अर्थसंकल्प नंतर छपाईसन २०१७-१८ या वर्षाचा स्थायी समिती अर्थसंकल्प लवकरच सभागृहात सादर करणार आहे. परंतु तो संक्षिप्त स्वरूपात असेल. सभागृहाच्या मंजुरीनंतर विस्तृत अर्थसंकल्प नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र व पदासह प्रकाशित केला जाणार आहे. आजवर स्थायी समितीतर्फे सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प अंतिम स्वरूपाचा असायचा. मंजुरीनंतर त्यात काही किरकोळ सुधारणा के ल्या जात होत्या.
परिवहन समितीच्या अर्थसंकल्पाला बे्रक
By admin | Published: April 30, 2017 1:30 AM