भाजपने देशभरात बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यानिमित्ताने नागपुरात शुक्रवारी भाजपच्या महिला मोर्चातर्फे रॅली आयोजित करण्यात आली होती. व्हेरायटी चौकात ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ चा संकल्प करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. या रॅलीत हजारो महिला, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
बेटी बचाव-बेटी पढाव जनजागृती
By admin | Published: October 03, 2015 2:34 AM