लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी २९ सप्टेंबरपासून आरंभ होतोय. यावेळी करण्यात येणाऱ्या घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजता पर्यंतचा आहे.या सर्वोत्तम मुहूर्ताच्या काळात वातावरणामध्ये शुक्र-बुध-चंद्र या ग्रहांचा मोठ्या प्रमाणात शुभप्रभाव असणार आहे. तसेच, दुपारी २ ते ३.३० वाजताच्या सुमारास गुरू ग्रहाचा प्रभाव राहणार असल्यामुळे, या काळातही घटस्थापना केली जाऊ शकते, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. यावर्षी मातामह श्राद्ध २९ सप्टेंबरलाच दुपारच्या वेळी करावे. बुधवारी २ ऑक्टोबरला उपांग ललितापंचमी करावी. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी घागरी फुंकण्याचा विधी तर रविवारी ६ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी व महानवमीचा उपवास करावा. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी महानवमी, सरस्वती विसर्जन, नवरात्र उत्थापन करावे. मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असून, त्याचा विजयमुहूर्त दुपारी २.०७ वाजतापासून ते २.५४ वाजतापर्यंत म्हणजेच केवळ ४७ मिनिटांचा असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत घटस्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:57 AM