शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पैसे ‘क्रेडिट’च्या मॅसेजपासून सावध रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:51 AM

सध्या तपास यंत्रणांसाठी डोेकेदुखीचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या बँक खात्यात हात घालण्यासाठी नवनवे तंत्र विकसित केले आहे. भन्नाट क्लृप्ती वापरून ते थेट बँक खात्यातूनच पैसे काढत आहेत.

ठळक मुद्देरक्कम जमा झाल्याची थापलिंक डाऊनलोड केल्यास बँक खात्यात घालू शकतात हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या तपास यंत्रणांसाठी डोेकेदुखीचा विषय ठरलेल्या सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या बँक खात्यात हात घालण्यासाठी नवनवे तंत्र विकसित केले आहे. भन्नाट क्लृप्ती वापरून ते थेट बँक खात्यातूनच पैसे काढत आहेत.तुमच्या खात्यात राहुलने (काल्पनिक नाव) रुपये जमा केले आहेत. ते शोधण्यासाठी विशिष्ट कोड वापरा आणि ती रक्कम मिळवण्यासाठी अमूक एक क्लीप डाऊनलोड करा, असे मेसेज सायबर गुन्हेगार रोज लाखो लोकांच्या मोबाईलवर पाठवत आहे. या गुन्हेगारांच्या थापेबाजीला बळी पडून त्याने दिलेला कोड वापरला किंवा त्याने सांगितलेली लिंक डाऊनलोड केली तर स्वत:च स्वत:च्या हाताने आपली फसवणूक केल्याचा धक्का पुढच्या काही मिनिटात आपल्याला बसू शकतो. कारण, आता प्रत्येकाच्या बँक खात्याला प्रत्येक नागरिकाचा मोबाईल संलग्न असतो. बँकेशी संबंधित कोणत्याही व्यवहाराची माहिती, सूचना या मोबाईल नंबरवर बँकेमार्फत आपल्याला दिली जाते. त्यामुळे त्या मोबाईलनंबरमध्ये एक प्रकारे आपल्या बँक खात्याची माहितीच दडली असते. या मोबाईल नंबरवर आपण सायबर गुन्हेगाराने दिलेली लिंक डाउनलोड केल्यास त्या लिंकच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये दडलेली आपली बँक खात्याची संपूर्ण माहितीच त्या गुन्हेगाराला माहीत पडते आणि त्या आधारे तो आपल्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम सहजपणे काढून घेऊ शकतो.अशा प्रकारे ठगविल्या गेलेल्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असून, तसे गुन्हेही सर्वत्र दाखल होत आहेत. त्यामुळे कोड वापरा, लिंक डाऊनलोड करा, अशा प्रकारचा मेसेज आपल्या मोबाईलवर आला असेल तर त्या मेसेजला तातडीने डीलिट करणे, हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे आपली बँक खात्याची माहिती आणि रक्कम सुरक्षित राहू शकते. हजार, पाचशे रुपये जमा झाल्याची थाप मारणाऱ्याच्या आमिषला आपण प्रतिसाद दिला तर मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे सावधान !

सतर्कता बाळगा : पोलीस आयुक्तआपल्याशी कवडीचा संबंध नसताना आपल्या खात्यात कुणी रक्कम जमा करणार नाही. आपण हा साधा विचार नेहमीच डोक्यात ठेवायला हवा. कोणतीच लॉटरी काढली नसताना आपल्याला कोट्यवधींची लॉटरी लागेलच कशी, याचाही नेहमी विचार करावा. प्रयत्न किंवा संपर्कच केला नसताना कोण बनेंगा करोडपतीसारख्या शोमध्ये तुम्हाला संधी मिळू शकत नाही. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होऊ शकत नाही. चुकून एखादवेळी एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले किंवा असा प्रकार घडला तर थेट बँकेत जाऊन संबंधित अधिकाºयांकडून प्रत्यक्ष आपल्या समस्येचे निराकरण करायला हवे. सायबर गुन्हेगारांना प्रतिसाद देणारांचे नेहमीच नुकसान होते. त्यामुळे फोन, मेसेज करून कसलेही आमिष अथवा धमकी देणारांना प्रतिसाद देऊ नये. सतर्कता हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

‘इंडिया ट्रेस डॉट कॉम’च्या आधारे माहितीसायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे मेसेज व इ-मेल पश्चिम उत्तरप्रदेशातून येत असल्याचे समोर आले. त्यांनी इंटरनेटवरील ‘इंडिया ट्रेस डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या आधारे याबाबत माहिती घेतली. त्यावेळी हे मेसेज उत्तरांचलमधून येत असल्याचे निष्पन्न झाले. बल्क मेसेजची सेवा देणाऱ्या कंपनीने याकरिता बीएसएनएलची सेवा घेतल्याचेही सांगितले जाते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम