लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लोकांमध्ये गुंतवणुकीची सवय आहे. गुंतवणूक केव्हा आणि कुठे करावी, यावर ते नेहमीच साशंक असतात. जास्त परताव्याची हमी देण्याच्या योजनांमध्ये सामान्य नेहमीच फसतात. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी घेण्यात येणाºया खबरदारीवर लोकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. लोकांनी ‘पोन्झी’ अर्थात बोगस योजनांपासून सावध राहावे, असा सूर अर्थतज्ज्ञांनी येथे काढला.आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेतर्फे गुंतवणूदारांना जागरूक करण्यासाठी गुंतवणूकदार जागृती कार्यक्रमांतर्गत ‘निवेश पाठशाला’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन नैवद्यम सभागृह, अंबाझरी येथे करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सीए पश्चिम क्षेत्रीय परिषदेचे सदस्य अभिजीत केळकर, नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष संदीप जोतवानी, अनुज बडजाते, सीए अमित दाणी, रोटरी क्लब आॅफ ईशान्सचे अध्यक्ष सीए प्रमोद जावंधिया आणि आयएमए नागपूरचे उपाध्यक्ष डॉ. संजय देवतळे उपस्थित होते.आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेचे केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूकदारांना जागरूक करण्यासाठी आयोजित मालिकेत पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लब आॅफ ईशान्य आणि इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूरचे सहकार्य लाभले.अनुज बडजाते यांनी गुंतवणुकीच्या धोरणावर माहिती दिली. बाजारपेठ स्थितीवर माहिती देताना दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास लोकांना निश्चितच फायदा होतो, असे त्यांनी सांगितले.अमित दाणी यांनी योग्य गुंतवणुकीचे महत्त्व समजावून सांगितले. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदाराने दीर्घकालीन गुंतवणूक करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी संदीप जोतवानी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी नागपूर सीए संस्थेचे सचिव सीए सुरेन दुरगकर, ‘विकासा’ चेअरमन सीए साकेत बगडिया, समन्वयक सीए जीतेन सगलानी, आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत राठी, रोटरी क्लब ईशान्सचे सचिव पीयूष फत्तेपुरिया, प्रीतेश चांडक आणि २५० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.
‘पोन्झी’ योजनांपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:09 AM
भारतीय लोकांमध्ये गुंतवणुकीची सवय आहे. गुंतवणूक केव्हा आणि कुठे करावी, यावर ते नेहमीच साशंक असतात.
ठळक मुद्देअर्थतज्ज्ञांचा सूर : ‘निवेश पाठशाला’वर कार्यक्रम