शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रागांच्या स्वरधारेने भिजले नागपूरकर

By admin | Published: August 01, 2016 2:03 AM

अतिशय सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेले पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, जपानचे युवा संतूरवादक

पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे मधाळ बासरीवादन : ताकाहिरो संतूरवादनासह कत्थक नृत्याची अनुपम अनुभूती नागपूर : अतिशय सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेले पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, जपानचे युवा संतूरवादक ताकाहिरो यांच्या वादनाचा स्वरविस्तार, चंद्रशेखर गांधी यांचे खुमासदार तबला वादन अशा दिग्गजांच्या वाद्यांच्या जुगलबंदीने रविवारची संध्याकाळ नागपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. शब्दसुरांचे एक मधूर नाते आहे. ते कायम चैतन्यदायी आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात आयोजित डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती आंतरराष्ट्रीय संगीत समारोहात कलाकारांच्या सादरीकरणाने त्याची प्रचिती अनुभवायला मिळाली. देशपांडे सभागृहात रविवारच्या संगीत सभेत प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जपानचे संतुरवादक ताकाहिरो व पुण्याच्या नृत्यगुरू पं. शमा भाटे यांच्या शिष्यांनी कत्थक नृत्याचे जोरदार सादरीकरण केले. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रामुख्याने खासदार कृपाल तुमाने, न्यायमूर्ती भूषण गवई, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खा. विजय दर्डा, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे निदेशक पीयूषकुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांच्याहस्ते नागपूरचे वरिष्ठ संगीततज्ञ नारायणराव मंगरुळकर व वरिष्ठ कत्थक गुरु पं. मदन पांडे यांना सन्मानित करण्यात आले. या संगीत सभेत प्रमुख आकर्षण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन ठरले. पंडितजींचे व्यासपीठावर आगमन होताच जिंदादिल नागपूरकरांनी प्रचंड उत्साहात टाळ्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादासह त्यांचे स्वागत केले. राग भूपाळीसह त्यांनी आपल्या बासरी वादनाला सुरुवात केली. पंडितजींचे श्वासावरील विलक्षण नियंत्रण, कायम आस पाझरणारा मधाळ स्वरबंध, वादनातील माधुर्य उपस्थित रसिक श्रोत्यांनी तनमनात जपून ठेवले. यावेळी त्यांना तबल्यावर साथसंगत करणारे पद्मश्री विजय घाटे व पखवाजवर भवानीशंकर यांच्यामुळे हे वादन अधिकच रंगत गेले. विशेष म्हणजे यावेळी पंडितजींनी नागपूरचे प्रतिभावान बासरी निर्माता मुकुंद लेकुरवाळे यांनी तयार केलेल्या बासरीसह वादन केले. श्रावणात आभाळात दाटून आलेले निळेसावळे मेघ, पाऊसधारांचे थंडगार शिडकावे व पंडितजींची पहाडी रागातील रोमांचक अनुभूती यासह अवघे सभागृह अनोख्या स्वरधारांमध्ये भिजून गेले. काश्मीरच्या लोकसंगीतातील वाद्याला शास्त्रीय रागसंगीतात मानाचे स्थान प्राप्त करून देणारे विश्वविख्यात कलाकार पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य जपानचे ताकाहिरो अराई व प्रसिद्ध तबलावादक चंद्रशेखर गांधी यांची जुगलबंदी अनोखी ठरली. ताकाहिरो यांनी राग यमनने आपल्या वादनाला सुरुवात केली. यानंतर विलबिंत, रुपक व त्रिताल त्यांनी वाजविले. चंद्रशेखर गांधी यांच्या खुमासदार तबला वादनाने उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह कलावंतांना भरभरून दाद दिली. संगीत सभेच्या शेवटच्या टप्प्यात कत्थकगुरू पुण्याच्या शमा भाटे यांच्या मार्गदर्शनात आठ शिष्यांनी बेले शैलीत सामूहिक नृत्य सादर केले. सुबक हावभाव, लयकारीच्या आवर्तनात भिजलेल्या घुंगरांचे व भिंगरीच्या गतीने फिरणारे कलात्मक नृत्याने रसिकांना मोहून घेतले. त्यांचे नृत्य पं. वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीवर आधारित होते. नृत्याचे हे नेत्रसुखद सादरीकरण अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, सावनी मोहिते, शिवानी करमरकर, केतकी साठे, नुपुर अत्रे, आर्या शेंदुर्णीकर यांनी केले. त्यांना वाद्यांवर चिन्मय कोल्हटकर, चारुदत्त फडके, प्रसाद रहाणे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.(प्रतिनिधी)