नागपूर : देशाच्या स्वातंत्र्याचळा ७५ व्या वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘आजादी का अमृत महोत्सव’उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पथनाट्याच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांना उजाळा देण्यात आला.
शुक्रवारी अजनी चौकात आयोजित कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, भाजयुमोचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले प्रामुख्याने उपस्थित होते. शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन युवती प्रमुख डिम्पी बजाज यांनी केले. यावेळी सचिन करारे, मनीष मेश्राम, देवदत्त डेहनकर, शेखर कुर्यवंशी, पंकज सोनकर, सनी राऊत, बादल राऊत, शौनक जाहागीरदार, वैभव चौधरी, ईशान जैन, संकेत कुकडे, प्रसाद मुजुमदार, अमेय विश्वरूप, निधी तेलगोटे, नीरज दोंटूलवार, घनश्याम ढाले, विक्की पांडे, यश शर्मा, वेदांत जोशी, मयुरी ठोंबरे, स्वाती वाघ प्रामुख्याने उपस्थित होते.