नागपूर : दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी दक्षता पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार व आवारात गर्दी टाळणे, महत्त्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी वर्ग अ व वर्ग ब अधिकाऱ्यांची दक्षता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. यात एक उपजिल्हाधिकारी तीन नायब तहसीलदारांचा समावेश करण्यात आला आहे. दक्षता पथकाने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर महत्त्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी विजया बनकर यांनी कळविले आहे.