शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला मागून धडक; दोन ठार, नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 1:29 PM

 Nagpur News नागपूर-सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उडाण पुलावर गुरुवारी पहाटे  भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दोन ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. 

ठळक मुद्देपाटणसावंगी येथील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  नागपूर-सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उडाण पुलावर गुरुवारी पहाटे  भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात दोन ठार तर ९ जण जखमी झाले आहेत.  जखमींना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धनराज बळीराम वानखेडे (७०) रा. पारतलाई ता.मोहखेड जि. छिंदवाडा व शिवराम रामाधार चौरिया (९५) रा.बामला ता.मोहखेड जि.छिंदवाडा अशी मृतांची नावे आहेत.  जखमीमध्ये ट्रॅव्हल्स चालक रवी फुलसिंग मालवीय (३१) रा. पिपला वन देवास, ट्रॅव्हल्स प्रवासी गोलू इकबाल मेवासी (२४), रा. भोपाळ, सलमान सलीम शेख (२३), रा भोपाळ, देवेंद्र शाहू (२३), रा भोपाळ, शबिया फिरोज शेख,(२५)  रा मानकापूर नागपूर, रामबाबू फहिरवर, (२९) रा. ओरिसा, आसू रोहिकार (२४) रा. जयताळा, नागपूर, अनुराग प्रेमसिंग यादव (२७) रा. इंदोर, संदीप कुमार मोहन शाहू (२९) रा. ओरिसा यांचा समावेश आहे.सविस्तर वृत्त असे की, रॉयल महाराजा कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एम पी ३० पी ०६८२ ही नागपूर मार्गे रायपूर येथे जात होती. याच दरम्यान आयसर ट्रक क्रमांक एम पी २८ जी ६६६६ हा छिंदवाडा येथून लसूनचे कट्टे घेऊन नागपूर भाजी मार्केट मध्ये जात होता. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास पाटणसावंगी उडाण पुलावर भरधाव ट्रॅव्हल्सने आयसर ट्रकवर मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात आयसर ट्रकच्या मागे बसलेले दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर ट्रॅव्हल्स ड्रायव्हर सह ८ प्रवासी जखमी झाले. घटने नंतर आयसर ट्रक चालक फरार झाला.  समजताच पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. मृत देह सावनेर येथील शवागृहात तर जखमींना मेयो हॉस्पिटल नागपूर येथे पाठविन्यात आले.            या अपघातामुळे उडाण पुलावरील एकतर्फी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी व NHAI च्या चमूने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून मार्ग मोकळा केला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकांवर  गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे, कृष्णा जुनघरे तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात