उमरेड : भरधाव माेटरसायकल राेड ओलांडणाऱ्या सांबरावर धडकली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चारगाव (मुगलाई) परिसरात नुकतीच घडली.
असलम गाैसू अगवान शेख (३४, रा. र्सिसी, ता. उमरेड) असे मृताचे नाव आहे. असलम एमएच ४० एक्स ७५०९ क्रमांकाच्या माेटरसायकलने वेगात जात हाेता. दरम्यान, चारगाव (मुगलाई) शिवारातील वळणावर त्याला सांबर आडवे आले आणि दुचाकीचा ताबा सुटून सांबरावर धडकल्याने ताे खाली काेसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राजीव लाेले करीत आहेत.