लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘भीम’ हा धार्मिक शब्द असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मत असून, त्यामुळे आयोगाने भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्या निर्णयाविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी २० जून २०१६ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यात आला होता. आयोगाने संबंधित वादग्रस्त कारणावरून १६ मार्च २०१८ रोजी अर्ज नामंजूर केला. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. भीम हे धार्मिक किंवा जातीय नाव नाही. भीम नावाची जात वा धर्म देशात अस्तित्वात नाही. भीम हे नाव डॉ. भीमराव आंबेडकर या नावाचा भाग आहे. त्यामुळे आयोगाचा निर्णय रद्द करून भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता प्रदान करण्यात यावी, असे याचिकाकर्त्याने याचिकेत नमूद केले आहे.आयोगाला नोटीसया प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून यावर १८ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले.
‘भीम’ हा धार्मिक शब्द : निवडणूक आयोगाचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 8:33 PM
‘भीम’ हा धार्मिक शब्द असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाचे मत असून, त्यामुळे आयोगाने भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्या निर्णयाविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्दे हायकोर्टात याचिका दाखल