नागपूर : या देशातील शोषित पीडित समाजाला हजारो वर्षांच्या धार्मिक रूढी परंपरांच्या गुलामगि गुलामीच्या शृंखला तोडून बुद्धाच्या समतावादी शीतल छायेत प्रवेश करण्याचा आज दिवस. डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आज ६४ वा वर्धापन दिन. आंबेडकर अनुयायांनी उत्साहात पण साधेपणाने साजरा केला.कोरोना महामारीच्या यधोक्यामुळे दरवर्षी होणार भव्य सोहळा यावेळी करणे शक्य झाले नाही. मात्र अनुयानानी आपल्या घरी आणि बुद्ध विहारात साधेपणाने तो साजरा केला. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमी येथे छोटेखानी सोहळा घेण्यात आला. सकाळी 8.30 वाजता दीक्षाभूमीवर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरइ ससाई यांच्या नेतृत्वात तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सामुहिक बुद्धवंदना घेवून भिक्शुसंघातर्फे बुद्ध गाथेचे पठन करण्यात आले . या प्रसंगी सचिव डॉ . सुधीर फुलझेले , ना . रा . सुटे , , अॅड . आनंद फुलझेले, विलास गजघाटे , डॉ . बी . ए . मेहेरे उपस्थित होते. समता सैनिक दलाच्या पथकाने शिस्तीत पथसंचालन करून मानवंदना दिली.
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 8:42 PM