आरोपींची कबुली : एक दिवसाची पोलीस कोठडीभिवापूर : कळमेश्वर शहरातील बुलडाणा अर्बन बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. या टोळीने भिवापूर शहरातील श्रीकृष्ण बँके त चोरी केल्याचे कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, या चोरट्यांना भिवापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. चौकशीसाठी त्यांची एक दिवसाची पोलीस कोठडीही घेण्यात आली होती. अभिषेक अनिल नगरारे (२१), संदीप विठ्ठल इंगळे (३६), राकेश दिलीप दास (२५), अनुप सुधीर पाटील (२२) सर्व रा. हिंगणा रोड नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. या चौघांनीही काही महिन्यांपूर्वी कळमेश्वरातील बुलडाण अर्बन बँक व भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत हात साफ केला होता. दरम्यान, १५ सप्टेंबरच्या रात्री गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या आरोपींनी भिवापुरातील श्रीकृष्ण बँकेत हात साफ केल्याचे कबूल करताच त्यांना सोमवारी भिवापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांची चौकशीसाठी एक दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आल्याची माहिती ठाणेदार मनीष दिवटे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)बँकेला लावले ‘सेंट्रल लॉक’सदर आरोपींनी २४ जानेवारीच्या मध्यरात्री नीलजपुरा भागात दारू ढोसली. त्यानंतर ते बँकेजवळ आले. संदीप इंगळे व अभिषेक नगरारे हे वाहनात थांबले तर राकेश दास व अनुप पाटील हे दोघे बँकेच्या दारावर पोहचले. राकेशने अनुपच्या पाठीवर चढून चॅनल गेटवरील लाईट काढला. आंधार होताच अनुपने लोखंडी टॉमीच्या सहाय्याने चॅनल गेट व शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. आतील कॅमेरावर नजर पडताच अनुपने कॅमेराचे वायर काढून त्याची दिशा बदलवली. मात्र, आरोपीचा चेहरा कॅमेरात कैद झाला. हातात काहीच न लागल्याने चोरटे निघून गेने. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनी बॅकांना ‘सेंट्रल लॉक’ लावण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्रीकृष्ण बँकेलाही ‘सेंट्रल लॉक’ लावण्यात आल्याची माहिती संबंधितांनी दिली.
भिवापुरातही फोडली बँक
By admin | Published: September 27, 2015 2:57 AM