शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

नागपूर जिल्ह्यातील भानेगावात भोंदूबाबाचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:18 PM

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिसांना दाखविली. त्याआधारे खापरखेडा पोलिसांनी भोंदूबाबाचा भंडाफोड करीत त्याला अटक केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून शस्त्र व विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देशस्त्रांसह विविध साहित्य जप्त : खापरखेडा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिसांना दाखविली. त्याआधारे खापरखेडा पोलिसांनी भोंदूबाबाचा भंडाफोड करीत त्याला अटक केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून शस्त्र व विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.संदीप प्रभूदास शिडाम (२८, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्या घरून तीन तलवारी, कट्यार, चार चाकू, खंजर, मोठी नागकाठी, पाच अंगठ्या, दोन मोबाईल, दोन कडे, ५० लिंबं, राख, रुद्राक्ष माळ, सट्टापट्टी नंबर, मजकूर लिहिलेले लहान मुलांचे पासपोर्ट फोटोसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.तो दोन वर्षांपासून भोंदूगिरी करीत होता. दरम्यान, दिलीप गणपत खारकर (५५, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांच्या पत्नीची प्रकृती खराब असल्याने तसेच औषधांनी आराम मिळत नसल्याने मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्नीला भोंदूबाबा संदीपकडे त्याच्या घरी नेले होते. त्याने दिलीपच्या पत्नीच्या अंगावरून राखेची पुडी, भस्म, लिंबू ओवाळून बाहेर फेकले आणि तिला एका व्यक्तीने बाहेरचे लावल्याचे सांगून तलवार व कट्यार दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. शिवाय, तिची प्रकृती बरी होणार असल्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून महिनाभरात ५० हजार रुपये उकळले.प्रकरण पोलिसात पोहोचताच पुरावे गोळा करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांनी पोलीस शिपाई प्रिया महल्ले व जितेश झडाने यांच्यावर सोपविली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेखर कोलते व पत्रकार संघाच्या सदस्यांनाही सोबत घेतले. प्रिया महल्ले यांनी आजारपणाचे नाटक केले तर, संदीपने तिच्यावर मंत्रोपचार केले. या प्रकाराची चित्रफित तयार करण्यात आली. त्या आधारे त्याच्या घरी धाड टाकून त्याला अटक केली.त्याला सावनेर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.संदीपने दिली धमकीपत्नी बरी होत नसल्याचे दिलीप यांनी भोंदूबाबा संदीपच्या निदर्शनास आणून दिले. सुरुवातीला त्याने न घाबरण्याचा सल्ला दिला. नंतर मात्र संदीपने दिलीप यांना अश्लील शिवीगाळ करीत त्यांना तुझ्याने जे जमते ते करून घे, अशी धमकी दिली. दिलीपने ही बाब पत्रकार संघाच्या सदस्यांना सांगितली व पोलिसात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर