शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

भुजबळ-पटोले-वडेट्टीवार हे तर हेराफेरीतील कलावंत : आशिष शेलार यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 9:42 PM

Ashish Shelarओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली असून छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ‘हेराफेरी’ या चित्रपटातील कलावंत आहेत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषद घेऊन केली.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने हेेराफेरी केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली असून छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ‘हेराफेरी’ या चित्रपटातील कलावंत आहेत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषद घेऊन केली. तसेच हेराफेरी चित्रपटातील बाबूभय्या, श्याम व राजू हे या तिघांपैकी नेमके कोण? हे मात्र त्यांनीच सांगावे असा चिमटाही शेलार यांनी काढला.

भंडारा व वर्धा येथील दौऱ्यानंतर शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले व विजय वडेट्टीवार हे तीन दिग्गज नेते राज्यातील आघाडी सरकारमधील महत्त्वाचे अंग आहेत. परंतु ते सरकारच्या बैठकीत वेगळे आणि बाहेर वेगळे बोलतात. फडणवीस यांनी टिकवलेले ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारला का टिकविता आले नाही. फडणवीस यांनी आरक्षणाबाबत जीआर काढला तो व्यपगत का करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोग स्थाापण्यास १४ ते १५ महिन्याचा वेळ का लागला. इंपेरिकेबल डाटा न्यायालय मागत असताना राज्य सरकारने काय केले? असा प्रश्नही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,, अर्चना डेहनकर, चंदन गाेस्वामी, सुनील मित्रा आदी उपस्थित होते.

विकास गवळी व रमेश डोंगरे यांच्याशी काँग्रेसचा संबंध काय?

ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत याचिका दाखल करणारे विकास गवळी व रमेश डोंगरे यांच्याशी काँग्रेसचा संबंध काय, असा प्रश्नही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या माहितीनुसार गवळी हे वाशीम येथील काँग्रेसच्या माजी आमदाराचे पुत्र आहे. यापैकी एक जण नाना पटोले यांचे खास आहेत. तेव्हा काँग्रेसनेच यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाMediaमाध्यमे