शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नागपुरातील भूमाफिया जगदीश जयस्वाल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 8:23 PM

वृद्ध मायलेकाच्या जुन्या तारखेतील मुद्रांकांवर (स्टॅम्प पेपर) सह्या घेऊन त्याआधारे त्यांची कोट्यवधींची जमीन हडपू पाहणाऱ्या एका भूमाफियाला मानकापूर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देबनावट दस्तावेजाचा गैरवापर : वृद्धाची जमीन हडपण्याचा प्रयत्न अंगलट, मानकापूर पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृद्ध मायलेकाच्या जुन्या तारखेतील मुद्रांकांवर (स्टॅम्प पेपर) सह्या घेऊन त्याआधारे त्यांची कोट्यवधींची जमीन हडपू पाहणाऱ्या एका भूमाफियाला मानकापूर पोलिसांनी अटक केली. जगदीशप्रसाद चंदनलाल जैस्वाल (वय ५०, रा. विठ्ठलनगर, बेसा) असे आरोपीचे नाव आहे. जयस्वाल हा जमिनीच्या कागदपत्रांच्या बनवेगिरीसाठी ओळखला जातो. भूमाफिया म्हणूनही जयस्वाल कुख्यात आहे. साथीदारांच्या माध्यमातून गरजूंना गाठायचे, त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवायची, त्यांना जुजबी स्वरूपात रक्कम देऊन जुन्या तारखेतील स्टॅम्प पेपरवर त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि त्याआधारे करारनामा (बनावट दस्तावेज) तयार करून कोट्यवधींच्या जमिनी किरकोळ रकमेत हडपण्याचा प्रयत्न करायचा, असा जयस्वालचा गोरखधंदा आहे. स्वामी समर्थ नगरी बेसा चौकाजवळ राहणारे रुपराव साहेबराव कराळे (वय ६२) आणि त्यांच्या वृद्ध आईची कळमेश्वर भागात ९२ एकर जमीन आहे. ते पूर्वी मानकापुरात राहायचे. काही वर्षांपूर्वी कराळेंसोबत जयस्वाल यांची ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत जयस्वालने कराळेंच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवून जुन्या तारखेच्या स्टॅम्पपेपरवर कराळेंच्या नावे करारनामा तयार केला आणि त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कराळे यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी २० डिसेंबर २००८ ते ६ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या या प्रकरणाची सुमारे सात महिने चौकशी केल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात जगदीश जयस्वाल, त्याची पत्नी ममता जयस्वाल तसेच साथीदार रत्नाकर एस. गवई (वय ५२, रा. द्वारकापूरी रामेश्वरी अजनी) आणि नितीन रमनिकलाल सोनमोरे (वय ३८, रा. समाधाननगर, वडगाव, यवतमाळ) या चौघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शनिवारी सकाळी जयस्वालला पोलिसांनी अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करून त्याचा ४ दिवसांचा पीसीआर मिळवला.अनेकांची फसवणूकआरोपी जयस्वाल याने आपल्या साथीदाराच्या माध्यमातून अशाच प्रकारे अनेकांच्या जमिनी हडपण्याचे प्रयत्न चालविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. ठगबाज जयस्वालने बनावट कागदपत्रांच्या आधारे करारनामे करून अनेकांना कोर्टातही येरझारा मारण्यास बाध्य केल्याचे समजते. दरम्यान, त्याच्याकडून जमिनीच्या फसवणुकीसंदर्भातील अनेक प्रकरणांची माहिती उघड होऊ शकते, असा विश्वास ठाणेदार वजिर शेख यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक