सोशल मीडियातील अपप्रचाराला उत्तर देणारसोशल मीडियावरून भाजप व सरकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, आता या अपप्रचाराला उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियासाठी विशेष टीम तयार केली आहे. दोन महिन्यांपासून सोशल मीडियात दिसून येणारी नकारात्मकता त्याचाच परिणाम आहे. बनावट अकाऊंट तयार करून ट्विट्स, रिट्विट तयार केल्या जात असल्याचे आढळून आले आहे. रशिया सारख्या देशांमधून अशा पोस्ट टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे, असेही त्यांनी सांगितले.विदर्भाच्या निधीत कट नाहीविदर्भाचा शक्य तेवढे देण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आता पहिली नियुक्ती किंवा पदोन्नती विदर्भातच होते, असे आमचे धोरण आहे. विदर्भातील रिक्त जागाही भरल्या जात आहेत. विदर्भाच्या निधीत कुठेही कट लावला जात नाही. विकासात विदर्भाला मागे पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाचे जानेवारीत भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:49 AM
सोशल मीडियावरून भाजप व सरकारचा अपप्रचार केला जात आहे. मात्र, आता या अपप्रचाराला उत्तर दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस : न्याय मिळतो या विश्वासाने आंदोलने वाढली