लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे ‘अ’वर्ग तीर्थक्षेत्र जाहीर करावे तसेच दीक्षाभूमीवर १४ एप्रिलला पोस्टाचे तिकीट काढावे, या दोन्ही मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे दलित मित्र भूषण दडवे यांना महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघाच्यावतीने ‘दीक्षाभूमी सेवक ’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविभवन सभागृहात पार पडलेल्या या समारंभाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, दलित मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त माधव झोड, कामगार नेते हरीश निंबाळकर उपस्थित होते. राज्याचे सरचिटणीस योगेश वागदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ममता गेडाम, समाज उत्थान पुरस्कार मिळालेल्या चिमणकर, डॉ. महादेव नगराळे यांचासुद्धा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भूषण दडवे ‘दीक्षाभूमी सेवक’ पुरस्काराने सन्मानित
By admin | Published: May 30, 2017 1:48 AM