नागपूर : न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांना नागपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती करण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी आदेश जारी केला आहे. आदेश बुधवारपासून लागू झाला आहे. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांना अमरावती, न्यायमूर्ती वासंती नाईक यांना वर्धा, न्यायमूर्ती अरुण चौधरी यांना बुलडाणा, न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांना भंडारा, न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे यांना चंद्रपूर, न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांना यवतमाळ, न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांना गडचिरोली व गोंदिया, न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना अकोला तर, न्यायमूर्ती झेड. ए. हक यांना वाशीम जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, वकिलांचे प्रश्न ऐकणे इत्यादी जबाबदाऱ्या पालक न्यायमूर्तींकडे असतात.(प्रतिनिधी)
भूषण गवई जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती
By admin | Published: April 02, 2015 2:27 AM