शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 8:31 PM

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. न्या. गवई हे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी राज्यपाल रा. सु. गवई यांचे चिरंजीव होत. ते मूळ अमरावतीचे आहेत. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.

ठळक मुद्देकॉलेजियमची शिफारस : हिमाचल प्रदेश येथील सूर्य कांत यांच्या नावाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई व हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. न्या. गवई हे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते व माजी राज्यपाल रा. सु. गवई यांचे चिरंजीव होत. ते मूळ अमरावतीचे आहेत. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यासाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ८ मे रोजी ही शिफारस केली. या कॉलेजियममध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रामना, न्या. अरुण मिश्रा व न्या. आर. एफ. नरिमन या पाच ज्येष्ठ न्यायमूर्तींचा समावेश होता. देशातील उच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या ज्येष्ठतेमध्ये न्या. गवई हे आठव्या तर, न्या. सूर्य कांत अकराव्या स्थानावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्या. गवई हे चौथ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. या दोघांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस करण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींची देशस्तरावरील ज्येष्ठता, पात्रता, वागणूक, प्रामाणिकपणा, सर्व उच्च न्यायालयांसह सर्व समाज व वर्गांना प्रतिनिधित्व मिळणे इत्यादी बाबी विचारात घेण्यात आल्या. कॉलेजियमची शिफारस मंजूर झाल्यास सर्वोच्च न्यायालयाला न्या. गवई यांच्या रूपाने दहा वर्षानंतर अनुसूचित जाती प्रवर्गातील न्यायमूर्ती मिळेल. तसेच, न्या. बोबडे हे मूळ नागपूरचे असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात विदर्भातील दोन न्यायमूर्ती पाहायला मिळतील.न्या. गवई यांची १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षानंतर त्यांना न्यायमूर्तीपदी कायम करण्यात आले. ते गेल्या १६ वर्षांपासून न्यायमूर्तीपदी कार्य करीत असून, यादरम्यान त्यांनी शेकडो महत्त्वपूर्ण निर्णय दिले. त्यांचे बहुतेक निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम राहिले, हे विशेष. त्यांनी २०१७ पर्यंत नागपूर खंडपीठात कार्य केले. मे-२०१७ मध्ये त्यांना मुंबई मुख्यपीठात बोलावून घेण्यात आले. तेव्हापासून ते मुंबईत कार्यरत आहेत.न्या. गवई यांचा सुरुवातीचा प्रवासन्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. कायद्याची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १६ मार्च १९८५ पासून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व माजी महाधिवक्ता दिवंगत राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. १९८७ मध्ये स्वतंत्र होऊन त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह विविध न्यायालयांत वकिली व्यवसाय केला. नागपूर खंडपीठात ते नागपूर व अमरावती महापालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी अधिवक्ता होते. तसेच, ते विविध स्वायत्त संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थासाठी नियमित बाजू मांडत होते. न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी नागपूर खंडपीठात ऑगस्ट-१९९२ ते जुलै-१९९३ पर्यंत अतिरिक्त सरकारी वकील म्हणून कार्य केले. त्यानंतर १७ जुलै २००० रोजी त्यांची मुख्य सरकारी वकीलपदी नियुक्ती झाली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय