मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त गुरुवारी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल रॅली काढून जनजागृती केली. सकाळी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओ भुवनेश्वरी एस., मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आकाशवाणी चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत सायकल रॅली काढली.
उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, उपद्रव शोधपथक प्रमुख वीरसेन तांबे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, बिष्णुदेव यादव, मेहुल कोसुरकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे सर्व स्थानाधिकारी, कर्मचारी व उपद्रव शोध पथकाचे जवान आदींनी या जनजागृती सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. भुवनेश्वरी एस. आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मार्गर्दशन केले. मनपान प्रशसनाने महिन्यातून एकदा सायकलने कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला असून आरोग्य जागृतीबाबत खारीचा वाटा उचलला आहे. त्या अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची यावर्षी रस्ता सुरक्षा ही संकल्पना आहे. त्यानुसार जनजागृतीसाठी मनपाच्या अग्निशमन विभागासह उपद्रव शोध पथकाचे जवान यामध्ये सहभागी झाले आहेत.