काटाेल : वेगात असलेली माेटारसायकल स्लीप झाल्याने दुचाकीचालक खाली काेसळला व गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काटाेल शहरात नुकतीच घडली.
मुकेश रमेश बारसे (२७, रा. अण्णाभाऊ साठे नगर, काटाेल) असे मृताचे नाव आहे. ताे मित्र वीरू दमे यास त्याच्या घरी साेडून देण्यासाठी एमएच-४०/बीएम-७१४९ क्रमांकाच्या माेटारसायकलने पेठ बुधवारकडे जात हाेता. वाटेत त्याचा ताबा सुटला व दुचाकी स्लीप झाल्याने दाेघेही खाली काेसळले. त्यात मुकेशच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला लगेच शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार प्रभुदास दलाल करीत आहेत.