लोकमत न्यूज नेटवर्कवर्षा बाशूनागपूर: शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर या विशेष मालिकेत आमंत्रित केलेल्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पडद्यामागे दिलखुलास गप्पा केल्या. आनंदवन व बाबा आमटे यांच्याविषयी आपण बरंच वाचलं व ऐकलं आहे मात्र प्रत्यक्ष कधी भेट होऊ शकली नाही असे मनोगत अमिताभ यांनी व्यक्त केले. मात्र आज प्रत्यक्षात ऐकताना त्या सर्व कार्याची उंची जाणवते आहे असेही ते पुढे म्हणाले. त्यांनी आनंदवन, बाबा आमटे, हेमलकसा, लोकबिरादरी प्रकल्पासह अन्य उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात आमटे कुटुंबियांनी कुष्ठरोगी व आदिवासींसाठी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमागील निरंतर लढा जाणल्यानंतर बिग बी भारावून गेले होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी त्यांना हेमलकसा व आनंदवन येथे येण्याचे सस्नेह निमंत्रणही दिले. आपल्याला हे सर्व उपक्रम पहायला निश्चितच आवडतील व आपण नक्कीच तेथे येऊ असे आश्वासन बिग बींनी त्यांना दिले.या कार्यक्रमात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी २५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले होते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील कामांची माहिती घेतलेल्या अमिताभ बच्चन यांनी त्याचवेळी त्यांना व्यक्तिगतरित्या २५ लाख रुपयांची देणगी प्रदान केली. या कार्यक्रमात आमटे दांपत्याची कन्या आरती हीदेखील सहभागी झाली होती.
केबीसीच्या सेटवर रंगल्या बिग बी व आमटे दांपत्याच्या दिलखुलास गप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 3:05 PM
शुक्रवार ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर या विशेष मालिकेत आमंत्रित केलेल्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पडद्यामागे दिलखुलास गप्पा केल्या.
ठळक मुद्देअमिताभने स्वीकारले गडचिरोलीत येण्याचे आमंत्रणहेमलकसा प्रकल्पाला शहेनशहाने दिले २५ लाख