लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनमुळे जगात आर्थिक मंदी असून लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आणि नंतर सरकारच्या नवीन तरतुदींचे पालन करून नव्याने काम सुरू करणे हे चार्टर्ड अकाऊंटंटसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे वेळेचे पालन करून लॉकडाऊननंतर सीएंना मोठ्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचे मत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी अध्यक्ष सीए सुनील तलाटी यांनी येथे व्यक्त केले.सीए संस्थेच्या सदस्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याच्या उद्देशाने नागपूर सीए संस्थेतर्फे वेबिनारचे आयोजन करण्यात आले. तलाटी हे एसईपीसी सेवा निर्यात संवर्धन परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.सुनील तलाटी म्हणाले, जगात सीएंना जवळपास ८० बिलियन अब्ज अमेरिकन डॉलरच्या संधी आहेत. संस्थेच्या मापदंडानुसार कोणतीही व्यक्ती वा संस्थेसोबत संपर्काच्या आधारावर आणि नेटवर्किंगसह आवश्यक सिस्टीम बेसला मजबूत करणे महत्त्वाचे आहे. वेबिनारमध्ये सहभागी सीए नवीन खंडेलवाल यांनी सीएंना मार्गदर्शन केले. त्यांनी कोरोनाच्या प्रभावावर चर्चा केली. ई-संशोधनांचा वापर करून लोकांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन केले.आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी यांनी वेबिनारच्या माध्यमातून सीएं सदस्यांना मार्गदर्शन सत्राचे महत्त्व सांगितले. लॉकडाऊननंतर सीएंच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे. त्याकरिता सीएंना सक्षम व्हावे लागेल. प्रत्येक सदस्य आणि विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी नागपूर शाखा सक्षम आहे. क्षेत्रीय परिषदेचे सदस्य सीए अभिजित केळकर यांनी मार्गदर्शन केले तर डब्ल्यूआयसीएएसएचे अध्यक्ष अक्षय गुल्हाने यांनी वेबिनारचे समन्वयन केले. शाखेचे सचिव सीए जितेन सगलानी यांनी आभार मानले.वेबिनारमध्ये शाखेचे उपाध्यक्ष सीए साकेत बागडिया, कोषाध्यक्ष सीए संजय अग्रवाल, माजी अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, सदस्य सीए हरीश रंगवानी, सीए जुल्फेश शाह, सीए राजेश काबरा, सीए चिराग कोठारी, सीए अर्जुन फाटक, सीए प्रीत चंदवानी, सीए उत्कर्ष मेहता, सीए मोहम्मद असीम नेहाल, सीए जगदीश गुप्ता आणि सीए सदस्य उपस्थित होते.