शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपूरच्या उच्चभ्रू राजनगर भागात मोठी वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:24 PM

एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देसापडल्यावर ग्राहकाने केले गैरवर्तन : एसएनडीएलच्या चमूसोबत धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली.एसएनडीेलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक झुबेर रंगूनवाला, प्लॉट क्र ३ विजय नगर, नेल्सन चौक येथे राहत असून ४१००१७०३२०८२, ४१००१६५५३८७९, ४१००१६५५३८५२ हे क्रमांक असलेले वीज मीटर त्यांच्याकडे आहेत. याच परिसरात ग्राहकाचा बांगला आणि बहुमजली इमारत आहे. बहुमजली इमारत असल्याने तिथे एकापेक्षा जास्त मीटर्स आहेत जे तळमजल्याच्या मीटर पॅनल वर आहेत. मीटर रिडींगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच फ्लॅट्सची मीटर्स दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणच्या काही फ्लॅट्समध्ये नियमित जोडणीच नसल्याचे लक्षात आले आहे. या फ्लॅट्सला बस बारवरून थेट वीज पुरवठा करण्यात येत होता यासाठी अंतर्गत वायरिंगमध्ये काही भूमिगत बदल करण्यात आले. तांत्रिक चमूच्या सजगतेमुळे ही वीज चोरी उघडकीस येऊ शकली.तत्पूर्वी ग्राहकाने काही फ्लॅट्ससाठी मीटर जोडणी घेतली परंतु प्रयोजनपूर्वक त्याने काही मीटर्समध्ये घोळ केला जो सुमारे ७ लाखांचा आहे. जेव्हा या काही वीज जोडण्यांची बिलं ग्राहकाने भरली नाहीत तेव्हा वीज पुरवठा खंडित करून मीटर कायमचे हटविण्यात आले. त्यानंतर वरील प्रकारे ग्राहकाने या फ्लॅट्समध्ये विद्युत पुरवठा सुरू करून घेतला. या प्रकरणात वितरण फ्रेन्चाइसी ने विद्युत कायद्याच्या सेक्शन १३५ अन्वये (पाहणी दरम्यान वीज चोरी उघड होणे) सतर्कता विषयक प्रकरण नोंदविले असून ग्राहकाला २.२३ लाखांचा असेसमेंट दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकाने पहिली चूक मान्य करून दंड भरण्याची तयारी दर्शवली.पोलिसात गुन्हा दाखलदरम्यान मंगळवारी त्याच बाबतीत चमूने पाठपुरावा केल्यास ग्राहकाने आक्रमक होऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान प्रक्रियेप्रमाणे चमूने पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करत असताना ग्राहकाने उपस्थित त्याच्या समर्थकांच्या साथीने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. प्रकरण आटोक्याबाहेर जाण्याआधी एसएनडीएलच्या चमूने सदर पोलीस स्टेशन गाठले आणि घडल्या प्रकारात मदतीची मागणी केली. शोहेब रंगूनवाला आणि त्यांच्या बंधू विरोधात सेक्शन ३२३ (साधी इजा किंवा दुखापत करणे) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीelectricityवीज