नागपूर : धंतोलीच्या एका प्रॉपर्टी डेव्हलपर्सने कानोलीची जमीन कोट्यवधी रुपयांत विकल्यानंतर अनेक नागरिकांना तुकड्यात जमिनीची विक्री केल्याचे उघड झाले आहे. गोपाल लक्ष्मण कोंडावार (वय ५९, रा. वाशी), किसन काशिप्रसाद बोरीले (६७, रा. लक्ष्मीनगर), विजय त्रिलोकचंद बोरुडिया (५८, रा. अजनी चौक) आणि मच्छिंद्र रामचंद्र कदम (६०, रा. चितळे चौक) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रफुल्ल पुरुषोत्तम गाडगे (५९, रा. रहाटे कॉलनी) हे आहेत. गाडगे यांचा धंतोलीच्या मेहाडिया चौकात गणेश चेंबरमध्ये प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. आरोपींनी गाडगे यांच्याकडून ५ एप्रिल २००७ रोजी कानोलीत १२ हेक्टर जमिनीचा ३ कोटी ८९ लाख ६९ हजारात सौदा केला. गाडगे यांनी आरोपींना २ कोटी ४५ लाखांची रक्कम रोक आणि धनादेशने दिली. परंतु, आरोपींनी जमिनीचा सौदा केल्यानंतर या जमिनीचा २.०३ हेक्टर भाग सतीश चिद्दरवारला विकला. त्यानंतर ०.८१ जमीन शिनगारेला विकली. याशिवाय संबंधित जमीन एनएसके मायनिंग कंपनीला विकली. फिर्यादीकडून २.४५ कोटी घेऊनही आरोपींनी फिर्यादीला रजिस्ट्री करून दिली नाही. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
............