लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) कोरोना विषाणूचा ‘कोविड १९’साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे काढली आहेत. यात प्रत्येक न्युमोनिया रुग्णांची व ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये साध्या सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळून आली त्यांचे नमुने तपासण्याच्या सूचना केल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त संशयित रुग्ण हुडकून काढण्याची योजना आखली जात आहे. पूर्वी बाधित देशांतून आलेल्या प्रवाशांचीच किंवा कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या खूप जवळून संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासण्याचे निर्देश होते. परंतु आता यात बदल करण्याचा सूचना ‘आयसीएमआर’ने दिल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार ज्यांना सर्दी, खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्या सर्वांचे नमुने तपासले जाणार आहे. विशेषत: जे रुग्ण रुग्णालयात भरती आहेत, ज्यांना गंभीर स्वरूपातील ‘न्युमोनिया’ आहे त्यांचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील रुग्णालयात सध्याच्या स्थितीत न्युमोनियाचे १५० वर रुग्ण असावेत. या सर्वांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ज्यांचे नमुने तपासण्यात आले त्यांच्यामध्ये कोणी पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. शहरात महानगरपालिकेचे मोठ्या संख्येत आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या परिसरातील घराघरात जाऊन संशयित रुग्णांची पाहणी करीत आहेत. या शिवाय, अनेक कर्मचारी संशयित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना साध्या सर्दीची किंवा सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास लागण्याची लक्षणे आढळून आल्यास त्यांची नमुने ‘व्हीआरडीएल’कडे पाठविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. परिणामी, मोठ्या संख्येत नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत येत आहेत. तीन पाळीत तपासणीचे काम सुरू असले तरी अहवाल येण्यास उशीर होत आहे.
न्युमोनिया रुग्णांचे नमुने बंधनकारक : आयसीएमआरच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:05 AM
‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) कोरोना विषाणूचा ‘कोविड १९’साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे काढली आहेत. यात प्रत्येक न्युमोनिया रुग्णांची व ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये साध्या सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळून आली त्यांचे नमुने तपासण्याच्या सूचना केल्या आहेत.
ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांना सादी सर्दी झाली तरी तपासणी