शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विषाणूने जातायेत जीव !

By admin | Published: August 31, 2015 2:44 AM

राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे.

नागपूर विभागाचे वास्तव : पाच वर्षांत स्वाईन फ्लूने २२७ तर, डेंग्यूने १०९ रुग्णांचा मृत्यूनागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१० ते आतापर्यंत डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७४३ वर गेली आहे. यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी दरवर्षी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. अशीच स्थिती स्वाईन फ्लू बाबत आहे. आजार पसरू नयेत यासाठी शासनाच्यावतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तज्ज्ञाच्या मते, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडे या दोन्ही आजाराशी मुकाबला करण्याची विशेष यंत्रणाच नाही. यामुळे दरवर्षी या आजाराच्या रुग्णासह मृत्यूची संख्या वाढत आहे. सहा महिन्यात स्वाईन फ्लूच्या मृत्यूची संख्या १२६नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४वर गेली. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३मध्ये २८, २०१४मध्ये १० तर ३० जून २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२६वर पोहचली. गतवर्षी डेंग्यूने घेतले ४३ बळी२०१० मध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती. २०११ मध्ये ८३ रुग्ण व ४ बळी गेले होते. २०१२ मध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ४२२वर पोहचली तर मृत्यूची संख्या १७ होती. २०१३ मध्ये रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली. १०९६ रुग्णांची नोंद झाली तर मृत्यूची संख्या ३५वर पोहचली. २०१४ मध्ये रुग्णांची संख्या २०९६ तर मृत्यूची संख्या ४३ झाली. जून २०१५ पर्यंत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले तर एकाही मृत्यूची नोंद नाही. स्वाईन फ्लूने १२७ महिलांचा मृत्यूस्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. २०१० मध्ये २१ पुरुष तर ३३ महिला, २०१२मध्ये पाच पुरुष तर ५ महिला, २०१३ मध्ये १९ पुरुष तर ९ महिला, २०१४ मध्ये ४ पुरुष तर ६ महिला तर सर्वाधिक मृत्यू या चालू वर्षात झाले. पुरुषांच्या मृत्यूची संख्या १०० झाली असून महिलांची संख्या १२७ वर गेली आहे.