पिपळा (डाकबंगला) : वृक्षाराेपणादरम्यान लावलेल्या राेपट्यांचे याेग्य संगाेपन व्हावे म्हणून सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला) येथे झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम काही वर्षापासून राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत वटपाैर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि. २४) पिपळा (डाकबंगला) येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यात गावातील झेंडा चौक, बाबा आमटे युवा पार्क, हनुमान मंदिर परिसर, शिवधाम या ठिकाणी यापूर्वी लावलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे संबंधित व्यक्ती लावलेल्या राेपट्याची याेग्य काळजी घेत असल्याची माहिती आयाेजकांनी दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. चंदू पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील तलमले, जीवनधर क्षीरसागर, सत्यवान तलमले, अशोक रडके, चक्रधर बावनकुळे, योगेश लोहकरे, अजय डोंगरे, विनोद श्रीवास, गणेश लांडे, धर्मभाऊ ढोणे, हेमराज वाठ, गुड्डू भोयर, बापूराव तिबोले, अशोक पाहुणे, योगेश पाहुणे, अजय तलमले, लकी तलमले, प्रमोद मेंघरे, रिया तलमले, मधुकर शेंडे, चंदू ठवकर, प्रकाश तांडेकर, देवा कदरे, गुनू पाटील, मल्हार लोहकरे, प्रियांश पाहुणे, अश्विनी कुंभलकर, काना तलमले यांच्यासह नागरिक व बच्चेकंपनी उपस्थित होते.