शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वर्धेत जन्मताच मिळतो ‘आधार’

By admin | Published: May 23, 2017 5:16 PM

जन्मताच बाळाची आधार नोंदणी करणारे वर्धा रुग्णालय राज्यातील कदाचित पहिलेच रुग्णालय ठरत आहे.

रूपेश खैरी। वर्धा : जन्माची नोंद करण्याकरिता शासनाच्यावतीने नवजात बालकाची एका महिन्यात आधार नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र वर्धेत बाळाच्या जन्माच्या काही तासातच आधार नोंदणी होत आहे. जन्मताच बाळाची आधार नोंदणी करणारे वर्धा रुग्णालय राज्यातील कदाचित पहिलेच रुग्णालय ठरत आहे. रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला येथे येणाऱ्या माता-पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या आदेशानुसार बालक व त्याच्या पालकांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतर आधार नोंदणीकरिता इतरत्र भटकावे लागणार नाही, याची दक्षता घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांची आधार नोंदणी करणे सुरू केली आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. महिलेची प्रसूती झाल्याच्या काही तासातच तो या बालकाची नोंद घेवून त्याची माहिती नियमानुसार आॅनलाईन पाठविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या चिमुकल्याचे आधार कार्ड त्याच्या घरच्या पत्त्यावर डाक विभागाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.शासनाच्यावतीने सर्वांनाच आधार कार्ड अनिवार्य केले आहे. प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि स्वत:ची ओळख दर्शविण्याकरिता आधार कार्ड महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेला हा उपक्रम येथे प्रसूतिकरिता येत असलेल्या सर्वसामान्यांना आधाराचाच ठरत आहे. वर्धेतील हा उपक्रम राज्याकरिता पायलट प्रोजेक्ट ठरणारा आहे.