लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष.प्राप्त माहितीद्वारे भारतीय मानक ब्युरोच्या चमूने बुटीबोरी येथील रासा पाईप्स प्रा.लि.वर छाप्याची कारवाई केली. ब्युरोच्या आयएएस मार्कचा चुकीचा उपयोग करण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आले. पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्यात येणाऱ्या अनप्लास्टिाईज्ड पीव्हीसी पाईपवर आयएसआय मार्क लावण्यात येत होता. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते. मार्क लावण्यासाठी उपयोगात येणारे स्क्रीन जप्त करण्यात आले. परिसरात मार्क लावण्यात येणाऱ्या सात स्क्रीन आणि पाच अनप्लास्टिकाईज्ढ पाईप जप्त करण्यात आले. यावर बनावट आयएसआय मार्क लावण्यात आला होता. बीआयएसने रासा पाईप्स प्रा.लि. तर्फे अपोलो, अपोलो गोल्ड आणि फ्लेक्स्पो ब्रॅण्ड नावाने तयार करण्यात येणाऱ्या आयएसआय मार्क यू-पीव्हीसी पाईप्सचा उपयोग न करण्याचे आवाहन केले आहे. ब्युरोचे प्रमुख विजय नितनवरे म्हणाले, उत्पादकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सोबतच उत्पादनावर लावण्यात आलेले आयएसआय मार्क खरे आहे वा नाही, याची शहानिशा बीआयएसच्या वेबसाईटवर मिळविता येते.
पीव्हीसी पाईप उत्पादकावर बीआयएसची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 1:38 AM
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष.
ठळक मुद्देबनावट आयएसआय मार्कचा उपयोग