शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

सीएएविरोधातील आंदोलनात भाजपाकडून निर्दयपणे दडपशाही : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 8:53 PM

: ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला.चव्हाण म्हणाले, सीएएला असलेला विरोध शांततामय मार्गाने प्रदर्शित करावा, असे आपले जनतेला आवाहन आहे. महाराष्ट्रात शांतपणे विरोध दर्शविला जात आहे. पोलीसही ही परिस्थिती येथे उत्तमपणे हाताळत आहेत. हा कायदा घटनाविरोधी असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्र सरकार हा लागू करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे राज्य सरकारची या संदर्भात भूमिका स्पष्ट आहे.ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे, तिथेच ही आंदोलने अधिक तीव्रपणे पेटली आहेत. हे वातावरण योग्य परिस्थिती हाताळून शांत करण्याची गरज असताना केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन हाताळत आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हट्टाने हा कायदा देशात लागू करू पहात आहे. यामुळे धर्मनिरपेक्षता बाजूला पडून एका धर्माचे प्राबल्य वाढविण्याचा आणि अल्पसंख्यकांना डावलण्याचा त्यांचा डाव यामागे दिसत आहे. धर्म हा कोणत्याही देशाचा आधार होऊ शकत नाही. असे असतानाही राष्ट्रीया स्वयंसेवक संघाचा अजेंडा धर्माचे प्राबल्य वाढविणे हाच आहे. तोच अजेंडा भाजपा सरकार चालवित आहे. यामुळेच देशात संघर्षाची परिस्थिती उद्भवली आहे.भारतामध्ये सुरू असलेल्या या घडामोडीकडे युरोपियन देशांचे लक्ष असून तेथील राजदूतांनी त्या संदर्भातील अहवालही संबंधित राष्ट्रांना पाठविला आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या भारताची प्रतिमा आंतराष्ट्रीय पातळीवर मलिन होत असल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा