कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:19 PM2022-12-28T14:19:54+5:302022-12-28T14:22:12+5:30

त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

bjp Chandrashekhar Bawankule comments on ncp ajit pawar over Baramati | कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल - चंद्रशेखर बावनकुळे

googlenewsNext

नागपूर : राज्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असून सत्ताधारी-विरोधकांकडून विविध मुद्दयांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल नागपुरात बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

माझ्या बारामतीच्या एका दौऱ्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे. करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना केला. 

बारामती विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही.  अजित पवारांच्या वागण्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम २०२४ मध्ये जनता करणार आहे. त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले. 

राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा सत्तेची फळ अजितदादांनी चाखले आहे. तरीही पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता असे त्यांचे राजकारण राहिले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे. ते ओबीसीचे मारेकरी आरोप बावनकुळे यांनी केला. लोकायुक्त कायदा हा महत्वाचा आहे. ज्यांनी ५० वर्ष सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भिती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.  

Web Title: bjp Chandrashekhar Bawankule comments on ncp ajit pawar over Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.