नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे हे नैराश्यातून वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. आमदारांचे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, उद्धव ठाकरे ते १६ आमदार अपात्र होणार असा दावा करत आहेत. असे म्हणणारे ठाकरे हे न्यायाधीश आहेत का, असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
बुधवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यपाल बदलाचे अधिकार आदित्य ठाकरे किंवा मला कुणालाही नाहीत. त्यामुळे याबाबत बोलणारे आदित्य ठाकरे हे राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. खा.संजय राऊत यांंच्यावरही त्यांनी याप्रसंगी टीका केली.
२०२४ मध्ये पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्ही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने आम्ही पक्ष वाढवण्याचे काम करत आहोत. २०२४ मध्ये पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.