मौदा : विकासकामांच्या बैठकीत प्रोटोकाॅल पाळला जात नसल्याचे सांगत आमदार टेकचंद सावरकर यांनी दोन दिवसांपूर्वी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्यावर तोफ डागली. तेव्हापासून कामठी-मौदा मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. याचे राजकीय पडसाद शुक्रवारी मौदा नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमटले. यात काँग्रेसच्या पाच नगरेसवकांच्या पाठिंब्यावर भाजपचे सुनील रोडे यांनी बंडखोरी करीत स्थानिक नेतृत्वापुढे आवाहन उभे केले. चुरशीच्या झालेल्या हा निवडणुकीत भाजपचे मुन्ना चलसानी यांचा विजय झाला.
मौदा नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भाजप नगरसेवकांत दोन गट पडले. भाजपमधील धुसफुसीला काँग्रेसने खतपाणी दिल्याने ही निवडणूक भविष्यातील राजकीय समीकरणाकडे संकेत दाखविणारी ठरत आहे.
मौद्याच्या विद्यमान उपाध्यक्ष शालिनी कुहीकर यांनी राजीनामा दिल्याने शुक्रवारी उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. नगरपंचायत कार्यालयात पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष भारती सोमनाथे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यात भाजपचे मुन्ना चलसानी व सुनील रोडे, काँग्रेसचे किशोर सांडेल व शिवसेनेचे शिवा माथुरकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होते. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर काँग्रेसचे सांडेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे दोन, तर शिवसेनेचा उमेदवार मैदानात कायम राहिला. हात उंचावून झालेल्या मतदानप्रक्रियेत चलसानी यांना ९, तर सुनील रोडे यांना सात मते मिळाली. तीत चलसानी यांचा दोन मतांनी विजयी झाला. शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक मतदानप्रक्रियेत सहभागी झाले नाही.
मौदा न. प. क्षेत्रात १७ वॉर्ड आहेत. यात भाजपचे ११, काँग्रेसचे ५ व शिवसेनेचे २ नगरसेवक विजयी झाले आहेत. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप नगरसेवक रोडे यांनी काँग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या बळावर दंड थोपटल्याने ऐनवेळी ही निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा धर्म पाळला असता तर येथे सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसला असता, हे विशेष. विजयानंतर चलसानी यांचे आमदार टेकचंद सावरकर आणि नगराध्यक्ष भारती सोमनाथे यांनी अभिनंदन केले.
===Photopath===
180621\img-20210618-wa0005.jpg
===Caption===
नगरपंचायत निवडणुकीत चलसानी फोटो