कर्नाटकात भाजपाच्या पराभवाने, नागपुरात काँग्रेसचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:55 AM2018-05-20T00:55:33+5:302018-05-20T00:55:49+5:30

कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला. भाजपाला हा मोठा धक्का असून काँग्रेसने दिलेल्या संवैधानिक लढ्याचे हे यश आहे, असे सांगत काँग्रेसजनांनी शनिवारी देवडिया काँग्रेस भवनात जल्लोष केला.

BJP defeats in Karnataka, Congress is uprooted in Nagpur | कर्नाटकात भाजपाच्या पराभवाने, नागपुरात काँग्रेसचा जल्लोष

कर्नाटकात भाजपाच्या पराभवाने, नागपुरात काँग्रेसचा जल्लोष

Next
ठळक मुद्देदेवडियासमोर फटाके फोडले : लढा देणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटकमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. त्यांनी पूर्वीच राजीनामा दिला. भाजपाला हा मोठा धक्का असून काँग्रेसने दिलेल्या संवैधानिक लढ्याचे हे यश आहे, असे सांगत काँग्रेसजनांनी शनिवारी देवडिया काँग्रेस भवनात जल्लोष केला. उपस्थितांना लाडू वितरण करुन, देवडिया भवनाच्या मुख्य द्वारासमोर फटाके फोडत, ढोलताशे वाजवत विजयोत्सव साजरा केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगडीही धरली.
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश महामंत्री डॉ. बबन तायवाडे, चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, बंटी शेळके, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, डॉ.गजराज हटेवार, जयंत लुटे, प्रशांत धवड प्रा.दिनेश बानाबाकोडे, संजय महाकाळकर,हुकूमचंद आमधरे,अशोकसिंग चव्हाण,नगरसेवक रेखा बाराहाते, दर्शनी धवड,रश्मी धुर्वे,निर्मला बोरकर, उज्ज्वला बनकर, प्रसन्ना बोरकर, रमेश पुणेकर, रश्मि उईके,रमण पैगवार, आदींच्या उपस्थितीत देवडिया भवनात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
या विजयाकरीता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनुकुमार सिघंवी, कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करुन कायदेशीर युक्तिवाद केला आणि फ्लोअर टेस्ट करण्याचा सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय करुन घेतला. त्याचप्रमाणे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद,अशोक गहलोत यांनी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावून सर्व आमदारांना एकसंघ ठेवण्यात यश मिळविले. या लढ्यासाठी सर्व नेत्यांचे अभिनंंदन करण्यात आले.
यावेळी प्रशांत ढाकणे, महेश श्रीवास, अशोक निखाडे,राजेश पौनीकर, संजय सरायकर, विना बेलगे,अशरफ खान, ईरशाद अली, प्रवीण गवरे, राजेश पौनीकर, संजय सरायकर, अण्णाजी राऊत, प्रसन्ना बोरकर,ं हरीश ग्वालवंशी, नरेश शिरमवार,रमण ठवकर,दयाल जसनानी, राजेश कुंभलकर,गीता काळे,सुनिता ढोले,स्नेंहल सुनिल दहीकर,सुलभा नागपूरकर,स्मिता कुंभारे,ललिता पिल्लेवार, फुलवंती साखरे, शिल्पा बोडखे, नंदा देशमुख, प्रशांत कापसे, राजू कमनानी,पुरुषोत्तम पारमोरे, रॉबर्ट वंजारी, राजाभाऊ चिलाटे, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे,चंद्रकांत हिंगे,बबनराव देवगडे,सुरेद्र राय,एमएम शर्मा, मो.समीर,नाजू भाई,अतीक कुरैशी,आनंद तिवारी,विवेक निकोसे,हरी यादव,यशवंत तुलशिकर,राजेद्र नंदनवार,बबन दुरुगकर,पंकज निघोट,पंकज थोरात,कुमार बोरकुटे, वैभव बोडखे,अमित पाठक,मिलिंद दुपारे आदींनी जल्लोष केला. 

Web Title: BJP defeats in Karnataka, Congress is uprooted in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.