शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

“बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, मराठी माणसाचा नाही”; फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 4:41 PM

संजय राऊत यांच्या विधानावर भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

नागपूर: गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. अलीकडेच बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा पारा चढलेला दिसला. मराठी माणूस पराभूत झाला म्हणून पेढे कसले वाटता? लाज वाटत नाही का, असा हल्लाबोल अप्रत्यक्षरित्या भाजपवर केला होता. यावरून भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून, बेळगावात संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला. मराठी माणसाचा नाही, अशी बोचरी टीका केली आहे. (bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut over criticism after belgaum election result)

“काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का?”; भाजपचा शिवसेनेवर पलटवार

बेळगाव महापालिका निवडणुकीत एकीकरण समितीचा पराभव झाला. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली होती. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसे गेली अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, या शब्दांत संताप राऊत यांनी व्यक्त केला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

बेळगावात संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव

बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

“एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? 

काँग्रेसने सातत्याने मराठी माणूस आणि हिंदुत्वाला सातत्याने विरोध केला. त्या काँग्रेसशी हातमिळवणी करून पेढे वाटताना लाज वाटली नव्हती का, अशी टीका भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी यापूर्वी केली होती. बेळगावचा विजय हिंदुत्वाचा विजय आहे. बेळगावचा विजय मराठी माणसांचा विजय आहे. बेळगावचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आहे. भाजपला हिंदुत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि मराठी माणसांचा कधी विसर पडणार नाही. बेळगावचा पराभव संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे, असे लाड यांनी म्हटले आहे. 

“शेतकरी थकतील हा केंद्रातील मोदी सरकारचा गैरसमज”; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

दरम्यान, बेळगावचा विजय झांकी है मुंबई अभी बाकी है. भाजपचा विजय आणि शिवसेनेचा पराजय मुंबईला राऊतांना दिसायला लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरारसह इतर ठिकाणीही मराठी माणूस भाजपसोबत खंबीरपणे उभा राहील. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत