भाजप ३१ तर काँग्रेस ३८ प्रभागात आघाडीवर गडकरी, फडणवीसांवर नागपूरकर खूश भाजप नगरसेवकांवर मात्र नाराजकमलेश वानखेडे नागपूरकेंद्र, राज्य व महापालिकेतही भाजप सत्तेत असल्यामुळे नागपूर महापालिकेची आगामी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. मात्र, भाजपतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या प्रतिष्ठेला धक्का लावणारे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणानुसार महापालिकेत फक्त ३१ प्रभागात भाजप आघाडीवर असल्याचे व काँग्रेस मात्र तब्बल ३८ प्रभागात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.एवढेच नव्हे तर ५४ टक्के नागपूरकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामकाजावर खूश असून महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप नगरसेवकांच्या कामांवर मात्र ५० टक्के नागपूरकर नाराज असल्याचे दिसून आले आहे. यामुळे महापालिकेतील ‘मिशन १००’ अयशस्वी ठरेल की काय, याची चिंता भाजपला सतावू लागली आहे. या सर्वेक्षणानंतर खडबडून जागे होत भाजपने आपल्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईतील एका राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या एजंसीकडून मे महिन्यात हे सर्वेक्षण करून घेतले. दोन सदस्यीय प्रभाग, महापालिकेतील भाजपची कामगिरी व नगरसेवकांचा ‘परफॉर्मन्स’ केंद्रस्थानी ठेवून हे सर्वेक्षण करण्यात आले. नागपूर शहातील सर्व वर्गातील, जाती-धर्मातील, व्यवसायातील लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणाने भाजपची झोप उडविली आहे. महापालिकेत गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप हॅट्ट्रिक मारेल असा दावा पदाधिकारी करीत आहेत. पण सर्वेक्षणानुसार भाजप हिटविकेट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.४० टक्के लोकांना मनपात काँग्रेस हवी सर्वेक्षणात भाजपला मोठा धक्का : नगरसेवक बदलण्याचा सल्ला नागपूर : महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा ठाम विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. मात्र, भाजपने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात या विश्वासाला तडा जाताना दिसत आहे. या वेळी महापालिकेत काँग्रेसची सत्ता यावी असे असे मत ४० टक्के नागपूरकरांवी सर्वेक्षणात नोंदविले आहे. तर भाजपला फक्त ३६ टक्के लोकांनीच पुन्हा पसंती दर्शविली आहे. ही आकडेवारी भाजपची चिंता वाढविणारी आहे. भाजपच्या नगरसेवकांवर कमालीची नाराजी दिसून आली आहे. नगरसेवक अपेक्षित ‘परफॉर्मन्स’ देऊ शकले नाहीत. नागपूरकरांनी या सर्वेक्षणातून भाजपने आगामी निवडणुकीत बहुतांश विद्यमान नगरसेवक बदलावे, असा सूचक सल्ला दिला आहे. तब्बल ६६ टक्के लोकांनी परत तोच चेहरा न देता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी शिफारस केली आहे. फक्त २८ टक्केच लोकांनी विद्यमान नगरसेवकांची पाठराखण केली आहे. नगरसेवकांबाबत असलेली नाराजी भाजपने अतिशय गांभीर्याने घेतली असून बऱ्याच विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कटण्याची शक्यता आहे. पक्ष म्हणून भाजपची महापालिकेत कामगिरी कशी राहिली याचाही आढावा घेण्यात आला. मात्र, यातही भाजपचा आलेख घसरला आहे. महापालिकेत सत्तापक्ष म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या कारभारावर ५४ टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. या अहवालानंतर भाजपने समाधान शिबिर घेत नागपूरकरांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, हे विशेष.(प्रतिनिधी)
सर्वेक्षणात भाजपला मोठा धक्का
By admin | Published: October 05, 2016 2:50 AM