लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल राऊत, शहर अध्यक्ष बंटी शेळके, ग्रामीण अध्यक्ष अनिल राय, एनएसयुआयचे अमीर नुरी, जावेद शेख, धीरज पांडे, आदींनी शनिवारी पत्रकार परिषद घेत या एल्गार मोर्चाची घोषणा केली. राऊत म्हणाले, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठापासून मोर्चाला सुरुवात होईल. मोर्चा यशवंत स्टेडियम येथे पोहचेल. तेथे जाहीर सभा होईल. मोर्चात पाच ते सहा हजार बेरोजगार युवक, युवतींसह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील. राज्यात १ लाख ७७ हजार शासकीय पदे रिक्त आहेत. याशिवाय बँक, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही नोकरभरती नाही. मोठमोठे मेळावे घेऊन युवकांना मिहानचे स्वप्न दाखविण्यात आले. पण प्रत्यक्षात नोकºया मिळाल्या नाहीत. यामुळे त्रस्त झालेला बेरोजगार युवक एकत्र येऊन एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सरकार विरोधात हुंकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.या मोर्चासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार, प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होतील, असा दावा बंटी शेळके यांनी केला. आपण स्वत: माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह सर्वच नेत्यांना फोन करून निमंत्रित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाने युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविले : युवक काँंग्रेसचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:01 PM
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने युवकांना लाखो नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात युवकांची दिशाभूल केली. नोकऱ्या न मिळाल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन भटकत आहे. युवकांना ‘एप्रिल फूल’ बनविणाऱ्या सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस, एनएसयुआयतर्फे १ एप्रिल रोजी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे१ एप्रिल रोजी बेरोजगारांचा एल्गार मोर्चा