नागपूर : माजी मंत्री बबन व भाजप आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. सहकाऱ्यांसह परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तात त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
रुग्णवाहिका फसली
विधिमंडळ परिसरातील विधानसभेसमोरील चेंबर वरून ॲम्बुलन्स जात असताना चेंबरचे झाकण फुटल्याने ॲम्बुलन्सचे चाक त्यामध्ये फसले लोकांच्या मदतीने ॲम्बुलन्सला धक्का मारून गाडी पुढे करण्यात आली. बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. विधान भवनाच्या मागच्या द्वारातून आत येत असताना एक गटाराच्या चेंबरमध्ये मागचे चाक फलसे. लोकांनी धक्का मारून तिला बाहेर काढले.